मुंबई (वृत्तसंस्था) : बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी आयपीएस अधिकारी आणि राज्य गुप्तचर विभागाच्या माजी प्रमुख रश्मी शुक्ला यांचा जवाब नोंदवला. शुक्ला आपल्या वकीलांसमवेत काल कुलाबा पोलिसांसमोर हजर झाल्या. दोन तासांहुन अधिक काळ हा जवाब नोंदवला गेला. यापूर्वी त्या १६ मार्च रोजी कुलाबा पोलिसांसमोर हजर झाल्या असल्याची माहिती एका अधिका-याने दिली.
वरिष्ठ पोलिस अधिकारी राजीव जैन यांनी फोन टॅपिंगच्या केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या महिन्याच्या सुरूवातीला त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना हे फोन टॅपिंग झालं होतं. नुकतचं या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं पोलिसांना १ एप्रिलपर्यंत शुक्लांविरुद्ध सक्तीची पावले उचलण्यास मनाई केली आहे.