भोसरी : नक्षञाचं देणं काव्यमंच मुख्यालय भोसरी यांच्यावतीने २० वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल व पारितोषिक वितरण सोहळा अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ठ कवी व साहित्यिक अँड.बाळासाहेब तोरस्कर यांच्या शुभहस्ते वृक्षपूजन करुन, झाडाला पाणी घालून पर्यावरण संदेश देत संपन्न झाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ कवी व साहित्यिक विलास शिंदे (परभणी), उदघाटक अँड बाळासाहेब तोरस्कर (ठाणे), नक्षञाचं देणं काव्यमंच राष्टीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे, प्रमुख पाहुणे जुन्नर तालुका मिञ मंडळ पुणे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे, काव्यमंच उपाध्यक्ष डॉ. अभय कुलथे, सरचिटणीस डॉ. शांताराम कारंडे (मुंबई), एम.एम.शेख, पञकार शिवाजी शिर्के, रोशनी कंगणे, अँड. पल्लवी बनसोडे, उल्हास पानसरे, अँड. संतोष काशिद इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून दिडशे कवी, कवयिञींनी सहभाग घेऊन काव्यरचना सादर करुन मैफलीत रंग भरला.

अँड. बाळासाहेब तोरस्कर म्हणाले की, “कवितेच्या माध्यामातून समाजप्रबोधन होत असते. काव्य जीवनातील चैतन्य आहे. समाजाने कवींना जपले पाहीजे. काव्यमंचचे कार्य कौतूकास पाञ आहे.”

कार्यक्रम अध्यक्ष विलास शिंदे म्हणाले की, “२० वर्षापासून काव्यक्षेञातील काम करणारी महाराष्ट्रातील एक प्रभावी संस्था आहे. काव्य चळवळ वाढवत ठेवण्याचे काम काव्यमंच सातत्यपुर्वक अखंड करत आहे. अनेकांना व्यासपीठ उपलब्ध करुन कवींना समाजात मान मिळून देण्याचा प्रयत्न केला आहे. कवितेने समाजातील अंधाकार दूर होण्यास मदत होईल. समाजाची संवेदनशीलता ही काव्यातुन जपली जाते.”

दरवर्षी विविध क्षेञात काम करणाऱ्यांचा गौरव संस्था करत असते. समाजभूषण पुरस्कार सुखदेव तात्या सोनवणे (पुणे), अतुलशेठ परदेशी (जुन्नर), जगन्नाथ कवडे (ओझर), जितेंद्र बिडवई (गोळेगाव), गौरव स्मृती पुरस्कार उद्योजक लक्ष्मीकांत काजळे (जुन्नर), उद्योजक सचिन सातपुते (पुणे), समाजसेवक सावळेराम रखमाजी डबडे कविरत्न पुरस्कार कविवर्य राजेंद्रकुमार शेळके (नारायणगाव), कुसुमाग्रज स्मृती गौरव पुरस्कार राज अहेरराव (निगडी), नक्षञ काव्यदौलत पुरस्कार तुझ्याचसाठी काव्यसंग्रहास कविवर्य प्राचार्य सतिश वाघमारे (पुणे), नक्षञ राजज्योतिष रत्न पुरस्कार राजु जयकर महाराज (अंबरनाथ), १३वी राज्यस्तरीय दिवाळी अंक पुरस्कार प्रथम क्रमांक-विशाखा (पुणे), व्दितीय क्रमांक-अधोरेखित (पालघर), तृतीय क्रमांक-लोकराजा (नाशिक), तसेच मानाचा नक्षञ गौरव पुरस्कार कवी हेंमत रत्नपारखी (सोलापुर), कवीसंजीव शेळमकर (रायगड), कवी भीमराव धुळप (मुंबई), कवी रमेश कांबळे (रायगड), कवी फकीर आतार (वडज), कवी चुडीराम पाथोडे (गोंदिया), कवी मंदार कऊटकर (नागपुर), कवी धनंजय साळवे (चंद्रपुर), कवी भोजराज कान्हेकर (गडचिरोली), कवी महेंद्र चौधरी (चंद्रपुर), कवी सचिन पाटील (अलिबाग), यांना स्मृतीचिन्ह, सन्मानपञ, पुष्पगुच्छ, मानाचा फेटा बांधुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी २० वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आली, या स्पर्धेला दरवर्षी प्रमाणे प्रचंड प्रतिसाद मिळाला. ३६८ कवितांमधून सहा कवितांची निवड करण्यात आली. त्यांना सन्मानपञ, स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ, मानाचा फेटा बांधून सन्मानित करण्यात आले. त्यातील प्रथम क्रमांक कवी रामदास घुंगटकर (यवतमाळ), श्रावणधारा “सळसळत्या धारांनी, मातीला सुगंध आला. शहारली वसुंधरा, आसमंत हा धुंदला”. द्वितीय क्रमांक कवी रवींद्र दळवी (नाशिक) आटोनिच्या झुल्यवरं “आटोनिया झुल्यावरं गेला पाउस नाचुन, सर्दावल्या त्या मनाले देल्ली अंगार लावून” तृतीय क्रमांक कवी शशी ञिभुवन (अहमदनगर) उभा श्रावण अंगणी “उभा श्रावण अंगणी, जागी माहेरची ओढ, आला सण पंचमीचा, मनी काहूर गं गोड.”

उत्तेजनार्थ कवी जितेंद्र रायपुरे (गडचिरोली) श्रावण धारा, उत्तेजनार्थ कवयिञी सौ. मेघा देसाई (चिंचवड) श्रावण, उत्तेजनार्थ कवयिञी सौ. पुष्पलता कोळी (जळगाव) सृष्टीचा कलाकार..! यांनी स्पर्धेत यश मिळविले,

यावेळी कवी उदय सर्पे (कणकवली-सिंधुदुर्ग) यांच्या “क्षण हे पहाटेचे” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच संस्थेच्या २० वर्षाच्या वाटचालीच्या कार्याचा आढावा घेणारा अंक ही काढण्यात आला.

कार्यक्रमाच्या संयोजनात मनमोहन जाल्लेपोल्लेलु, मोहन कुदळे, मंगेश शेळके,शिवनाथ गायकवाड, किरण आळेकर, सुरेश माळी, प्रविण खांडेकर, परवेज चौधरी, शकील जाफरी, सतिश आवटे, दिलीप गोरे, विजय निकम, साईराजे सोनवणे, दिलीप विधाटे, शकील जाफरी इत्यादीनी पुढाकार घेतला.

कार्यक्रमाचे प्रभावी बहारदार सुञसंचालन डॉ. प्रा. सौ. लता माळी (मंगळवेढा) यांनी केले. प्रास्ताविक प्रा. राजेंद्र सोनवणे, आभारप्रदर्शन उदय सर्पै यांनी मानले. सात तासांच्या काव्य मैफलचा शेवट पसायदानाने करण्यात आला. यावेळी २२ सप्टेंबर जागतिक कवी साजरा करण्यात आला. सहावे अखिल भारतीय मराठी नक्षञ महाकाव्य संमेलन २०२० चे नियोजन श्रीक्षेञ विघ्नहर गणपती पविञ स्थळी ओझर येथे आयोजनाची घोषणा करण्यात आली.