नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कोविड-१९ च्या उपचारासाठी लागणारी औषधं आणि उपकरणांवर लागू असलेला वस्तू आणि सेवा कर १२ टक्क्यावरुन ५ टक्क्यावर आणल्याचं अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. आयुष्यमान भारतअंतर्गत केंद्र सरकारनं विविध विमा योजना लागू केल्या असून यापैकी ६६ टक्के वाटा केंद्र सरकार उचलणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.