नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जैन धर्माचे २४ वे तिर्थनकार भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली आहे. भगवान महावीरांनी अहिंसा, सदाचार, पवित्रता या गुणांचा अंगिकार करून अध्यात्मिक मुक्तीचा मार्ग दाखवला, असं राष्ट्रपतींनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे. भगवान महाविरांनी दिलेली आंतरिक शिकवण आणि भुतदया शांतीप्रिय समाजाच्या निर्मितीसाठी उपयोगी पडते, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे. भगवान महावीर यांनी प्राणिमात्रांच्या अस्तित्त्वाबाबत जगा आणि जगु द्या असा संदेश देत पंचशीलची शिकवण दिली, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. भगवान महावीर यांच्या शिकवणुकीत विश्व कल्याणाची ताकद आहे, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.