नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुन्हेगार ओळख प्रक्रिया विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. गुन्हेगारी प्रकरणात आरोपी आणि संशयित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी आवश्यक असणारी बायो मेट्रिक माहिती नोंदवणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. तपासणीसाठी गुन्हेगारांची बोटं, तळहात, तळपाय यांचे ठसे, छायाचित्रं, डोळ्यातल्या आयरिस आणि रेटिना यांचे स्कॅन यासह इतर नमुने गोळा करण्याची परवानगी या कायद्याद्वारे दिली जाणार आहे. हा कायदा कैदी ओळख कायदा १९२० च्या जागी अस्तित्वात येणार आहे.