मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात विविध मतदारसंघांमध्ये २५१ उमेदवारांनी ३१३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आजपर्यंत एकूण ३६६ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम मुदत ४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांनी दिली.

नंदुरबार जिल्ह्यात आज १ मतदारसंघात १ उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले. धुळे जिल्ह्यात १ मतदारसंघात २ उमेदवार, जळगाव जिल्ह्यात ४ मतदारसंघात ५ उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ३ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात १ मतदारसंघात १ उमेदवार, अमरावती जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७ उमेदवार, नागपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ८ उमेदवार, भंडारा जिल्ह्यात २ मतदारसंघात ३ उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात २ मतदारसंघात ५ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात २ मतदारसंघात २ उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५ उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात ४ मतदारसंघात ६ उमेदवार, नांदेड जिल्ह्यात ६ मतदारसंघात ११ उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात १ मतदारसंघात २ उमेदवार, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ६ उमेदवार, जालना जिल्ह्यात ४ मतदारसंघात ९ उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात ६ मतदारसंघात ६ उमेदवार, नाशिक जिल्ह्यात ५ मतदारसंघात ८ उमेदवार, पालघर जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६ उमेदवार, ठाणे जिल्ह्यात ११ मतदारसंघात १६ उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात १० मतदारसंघात ११ उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात ४ मतदारसंघात ६ उमेदवार, रायगड जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७ उमेदवार, पुणे जिल्ह्यात १२ मतदारसंघात २५ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात ५ मतदारसंघात ७ उमेदवार, बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात १० उमेदवार, लातूर जिल्ह्यात ४ मतदारसंघात ९ उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात २ मतदारसंघात ३ उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात ८ मतदारसंघात २१ उमेदवार, सातारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात १ मतदारसंघात १ उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात १ मतदारसंघात २ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात ९ मतदारसंघात १७ उमेदवार, सांगली जिल्ह्यात ६ मतदारसंघात ८ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली.