पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीने संशोधनात्मक शिष्यवृत्ती देण्यासाठी अर्ज मागवले होते. यासाठी एकूण 460 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यासाठी लेखी परीक्षा आझम कॉलेज कॅम्पस मध्ये रविवारी घेण्यात येणार आहे. यातून 105 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येणार आहे. परंतु परीक्षा न घेता सरसकट सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे.

बार्टी संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेतून केवळ 105 विद्यार्थ्यांना संशोधनपर शिष्यवृत्ती मिळणार आहे. परंतु बार्टीच्या धर्तीवर सुरू झालेल्या सारथी या संस्थेने गेल्या दोन महिन्यांत अशाच प्रकारे संशोधनासाठी विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले आणि त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून लेखी परीक्षा न घेता सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू केली आहे.