नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात साखरेची उपलब्धता आणि किमतीमध्ये स्थिरता राखण्याच्या दृष्टीनं सरकारनं १०० लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. परदेश व्यापार महानिदेशालयानं यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. साखर निदेशालय, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग यांच्या सहमतीनं ही निर्यात केली जाणार आहे. येत्या एक जून पासून ३१ ऑक्टोबर पर्यंत हा आदेश लागू असेल,असं या अधिसूचनेत म्हटलं आहे. या निर्णायामुळे साखर हंगामाच्या अखेरपर्यंत ६० ते ६५ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहील, हा साठा दोन ते तीन महिने घरगुती वापरासाठी उपयोगी होईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.