नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा परीक्षा २०२१ चे निकाल आज जाहीर केले. यात पहिल्या ४ ही स्थानावर महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. श्रुती शर्मानं देशभरातून पहिला क्रमांक पटकावला असून त्यानंतर अंकिता अग्रवाल, गामिनी सिंगला, ऐश्वर्या वर्मा यांचा क्रमांक लागला आहे. केंद्र सरकारमधल्या गट अ आणि गट ब मधल्या पदांसाठी एकूण ६८५ उमेदवारांच्या नावाची शिफारस UPSC नं केली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेसाठी १८०, परराष्ट्र सेवेसाठी ३७ आणि पोलिस सेवेसाठी २०० उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. यासाठी जानेवारी मुख्य परीक्षा आणि एप्रिल-मे महिन्यात मुलाखती झाल्या होत्या.