नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं आज 2022-23  हंगामातल्या सर्व खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत वाढ करायला मान्यता दिली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले की मंजूर केलेले दर देशातल्या सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वाधिक दरवाढ तीळ, मूग, सूर्यफूल, तूर, उडीद आणि भुईमूग या पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये करण्यात आली आहे.

याशिवाय कापूस,सोयाबीन, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका यांच्याही किमान आधारभूत किमतीत वाढीची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे शेतक-यांना खात्रीशीर किमतीची हमी मिळेल आणि आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल असं ही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितलं.