मुंबई (वृत्तसंस्था) : वेलनेस अर्थात निरामय जीवन हा आज जागतिक उद्योग बनला असून या क्षेत्रात भारत पूर्वीपासून सामर्थ्यवान असून देशाने या क्षेत्रात जगाला नेतृत्व प्रदान करावं असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केलं. फिटनेस आणि वेलनेस क्षेत्रातील ४० व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते काल राजभवनात ग्लोबल वेलनेस डे पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी ते बोलत होते. निरोगी जीवनासाठी योग, ध्यानधारणा, शांती, संगीत आणि संतुष्टी आवश्यक असल्याचं मत राज्यपालांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमाला ‘वेलनेस’ राजदूत रेखा चौधरी, चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे आणि अभिनेते विद्युत जामवाल उपस्थित होते.