नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांच्या सशक्तीकरणाशिवाय देशाची प्रगती शक्य नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज गुजरातमध्ये २१ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यावेळी ते बोलत होते. गुजरातला महिलांची मोठी ताकद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

महिलांच्या सशक्तीकरणाविना देशाची प्रगती अशक्य असल्याचं ते म्हणाले. बडोदाही संस्कार नगरी आहे, आईचं प्रेम देणारं शहर आहे असं त्यांनी सांगितलं. आजचा दिवस मातृत्वाला वंदन करण्याचा असल्याचं त्यांनी सांगितलं. मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचा आज १०० वा वाढदिवस आहे. महिलांसाठी ८ हजार कोटी रुपयांची मुख्यमंत्री मातृशक्ती योजना आणि पोषण सुधार योजनेचा प्रारंभ मोदी यांनी केला.