मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरुन हकालपट्टी केल्याप्रकरणी शिवसेनेविरुद्ध कायदेशीर लढा देणार असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. ते आज गोव्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शिवसेनेच्या विरोधात जाण्यासाठी नव्हे तर अन्यायाविरोधात जाण्यासाठी बंडाचं पाऊल शिंदे गटानं उचललं असून आजही शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपल्या गटाला प्रचंड आदर असल्याचं केसरकर यावेळी म्हणाले.
एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, असंही उद्धव ठाकरे यांनी काल स्पष्ट केलं असून एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचं शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलं, हे लोकशाहीला शोभणारं नाही असंही केसरकर म्हणाले.