मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणांनी बाधित रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्यावर भर द्यावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केली आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी विविध शासकीय योजनांचा आढावा घेतला. यावेळी त्या बोलत होता.

 मालेगाव मध्ये कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेणारे ६० पूर्णांक ८ दशांश टक्के, तर दुसरी मात्रा घेणाऱ्यांचं प्रमाण २५ पूर्णांक ४ दशांश टक्के इतकंच प्रमाण आहे. त्यामुळे मालेगावमध्ये लसीकरणाबाबत जागृती करावी असं आवाहन त्यांनी केलं.

शासनाच्या ई संजीवनी टेली मेडिसिन तसंच वन नेशन वन राशन या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसंच ग्रामीण भागातली मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी एक दिवस शाळेसाठी असा उपक्रम राबवण्याचं आवाहन त्यांनी केलं.