मुंबई (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात डहाणू आदिवासी विकास प्रकल्पातल्या झाई शासकीय आश्रमशाळेत नऊ वर्षांच्या एका मुलीला फुफ्फुसांत संसर्ग झाल्यानं काल मृत्यू झाला. मृत विद्यार्थीनीचं शवविच्छेदन मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात झालं. त्यात मृत्यूचं कारण स्पष्ट झालं. याच आश्रम शाळेतल्या इतर विद्यार्थांची वैद्यकीय तपासणी केली असता आणखी 11 विद्यार्थ्यांनाही संसर्ग झाला असून त्यांच्यावर डहाणू उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.