नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या प्रमुख खाद्य तेल संघटनांनी खाद्य तेलाच्या किमती प्रति लीटर 15 रुपयांनी तत्काळ कमी कराव्यात असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. तेल उत्पादक आणि शुद्धीकरण कंपन्यांनी वितरकांसाठीचे दरही तत्काळ कमी करावेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत.
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने 6 जुलै रोजी खाद्य तेल संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत हे निर्देश दिले. खाद्य तेलाचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कमी होत असून दर कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत त्वरित पोहोचायला हवा, असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.