नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अमली पदार्थ नियंत्रण विभागानं रिया चक्रवर्तीसह ३५ जणांच्या विरोधात स्थानिक न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. सुशांतसाठी रियानं अमली पदार्थ  खरेदी केले असल्याचं या आरोपपत्रात म्हटलं आहे. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती याचाही आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणात रियावरचे आरोप सिद्ध झाले तर तिला १० वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. एनसीबीसह ईडी आणि सीबीआय देखील या प्रकरणाची चौकशी करत आहेत.