मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विधीमंडळ सचिवालयानं पत्रकात दिली आहे. येत्या सोमवारपासून हे अधिवेशन प्रस्तावित होतं. मात्र संसदीय कार्य विभागानं दिलेल्या सूचनेनुसार हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. सोमवारी, १८ जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळं हे अधिवेशन पुढे ढकललं जाण्याची शक्यता, विधानसभेच्या ३ आणि ४ जुलै रोजी झालेल्या झालेल्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली होती.