नवी दिल्ली : भारत-कझाकिस्तान यांच्यातल्या चौथ्या लष्करी कवायतीचा काझिंद – 2019 चा आज उत्तराखंडमधल्या पिठोरागड येथे समारोप झाला. जंगल तसेच डोंगराळ भागातले संयुक्त प्रशिक्षण, महत्वाची व्याख्यानं, दहशतवाद विरोधी कारवाईसंदर्भात प्रात्यक्षिक यांचा यात समोवश होता.
काझिंद – 2019 उभय देशांमधली मैत्री वाढवण्यासाठी यशस्वी राहिला. डोंगराळ आणि जंगलांमध्ये दहशतवादविरोधी कारवाईसाठी दोन्ही देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धतींचे यावेळी आदान-प्रदान करण्यात आले. यामुळे परस्पर सहकार्य आणि विश्वास बळकट होण्यासाठी मदत होणार आहे.