नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांचा भारताचे एकोणपन्नासावे सरन्यायाधीश म्हणून आज शपथविधी झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी उपराष्ट्रपती जगदीश धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

न्यायमूर्ती उदय लळित यांचा कार्यकाळ ८ नोव्हेंबर पर्यंत राहील. वर्तमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा काल निवृत्त झाले. लळित यांनी यापूर्वी तिहेरी तलाक सारख्या महत्वाच्या विषयांवरील निर्णयप्रक्रियेत भाग घेतला होता आणि सरन्यायाधीश म्हणूनही काही मुख्य सुनावणींची हाताळणी ते करणार आहेत.