नवी दिल्ली : पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातल्या तीन आरोपींना मुंबईतल्या न्यायालयानं, येत्या 23 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. एच.डी.आय.एलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश वाधवान, त्याचा मुलगा सारंग, आणि पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वर्यम सिंग या तिघांना काल महानगर दंडाधिकारी एस जी शेख यांच्यापुढं हजर करण्यात आलं.
त्यानंतर सक्तवसुली संचालनालयानं मनीलाँड्रिंग कायद्याखाली वाधवान पिता-पुत्रांना ताब्यात घेण्यासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानं त्यांना आवश्यक औपचारिकता पूर्ण करायला सांगत कामकाज तहकूब केलं, आणि पुढची तारीख दिली.