मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतल्या ‘अधीश’ या बंगल्यातलं बांधकाम बेकायदा असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. दोन आठवड्यात बंगल्यातलं बांधकाम पाडण्याचे आदेश न्यायालयानं प्रशासनाला दिले असून, याप्रकरणी राणे यांना दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सी आर झेड कायदा आणि एफ एस आय चं उल्लंघन केल्याचं आढळल्यानंतर न्यायालयानं हा निकाल दिला असून, दोन आठवड्यात यासंबंधी कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत.