मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुणे शहरातील चांदणी चौक पूल येत्या १ आणि २ ऑक्टोबर म्हणजे शनिवार-रविवारच्या मध्यरात्री नियंत्रित स्फोट करून पाडण्यात येणार आहे. त्यासाठी १ ऑक्टोबर रोजी रात्री ११ ते २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यात येणार आहे.याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.