नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं पुण्यातल्या सेवा विकास सहकारी बँकेचा परवाना आज रद्द केला. त्यामुळं बँकेला आजपासून कुठलेही व्यवहार करता येणार नाहीत. बँकेचं कामकाज आटोपण्यासाठी आणि अवसायक नेमणुकीसाठी आवश्यक कारवाई करण्याची विनंतीही बँकेनं सहकार आयुक्त आणि सहकारी संस्था निबंधकांना केली आहे. बँकेकडे पुरेसं भांडवल नाही, व्यवसाय वृद्धीची संधी नाही, बँकिंग नियमन कायद्याच्या तरतुदींची बँक पूर्तता करत नाही.