नवी दिल्ली : जागतिक व्यापार वृद्धि क्षेत्रातली मंदी ही संकटाचं रुप धारण करण्यापूर्वी ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. वाढते व्यापारी सहकार्य, भौगोलिक तसंच राजकीय पातळ्यांवरील अनिश्चितता आणि कर्जवसूलीच घसरतं प्रमाण रोखण्यासाठी जागतिक पातळीवर परस्पर सहकार्य गरजेचं आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या मंत्रीस्तरीय समितीच्या विकासगटाच्या सत्रात त्या बोलत होत्या. अमेरिकेत सध्या वॉशिंग्टन इथं आयएमएफ आणि जागतिक बँकेची वार्षिक बैठक सुरु आहे.