नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिरे व्यापारी आणि सरकारी बँकांमध्ये सुमारे ११ हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार करून पळून गेलेला नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. लंडन उच्च न्यायालयानं निरव मोदीची भारतात परत पाठवण्याविरोधात केलेली याचिका आज फेटाळली. पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी त्याच्यावर  भारतात खटला दाखल आहे. तसेच इतरही दावे प्रलंबित असून केंद्रीय अन्वेषण विभाग आणि सक्त वसुली संचलनालयाला  त्याला चौकशीसाठी ताब्यात घ्यायचं आहे.