नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड संकटाच्या काळात आंतरराष्ट्रीय विमानांतून येणाऱ्या प्रवाशांसाठीचा ‘हवाई सुविधा अर्ज’ आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आजपासून बंद केला आहे. जागतिक स्तरावर आणि भारतातही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानामुळे कोविड-१९ चं प्रमाण कमी झाल्यामुळे सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता सर्व प्रवाशांनी त्यांच्या देशातील कोविड विरूद्ध मान्यताप्राप्त वेळापत्रकानुसार पूर्ण लसीकरण करणं आवश्यक आहे; विमान प्रवासापूर्वी बंधनकारक असलेली आरटी-पीसीआर चाचणी मात्र बंद करण्यात आली आहे.