नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संसदेचं रक्षण करत प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज श्रद्धांजली वाहिली आहे. शहीद झालेल्या जवानांच्या आणि सुरक्षा रक्षकांच्या प्रती राष्ट्र सदैव ऋणी राहील, अशा शब्दात राष्ट्रपतींनी ट्विट संदेशाद्वारे कृतज्ञता व्यक्त केली आहे.

उपराष्‍ट्रपति आणि  राज्‍यसभेचे सभापती  जगदीप धनखड, लोकसभा अध्‍यक्ष ओम बिर्ला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील आज संसदेच्या प्रांगणात दहशतवादी हल्ल्यातल्या शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे.

तसंच संयुक्त पुरोगामी आघाडीच्या  अध्‍यक्ष सोनिया गांधी, राज्‍यसभेचे सदस्य  पीयूष गोयल, राज्‍यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, कांग्रेस नेता अधीर रंजन चौधरी, संसदीय कार्य मंत्री प्रल्‍हाद जोशी आणि इतर मान्यवर तसंच लोकसभा आणि  राज्‍यसभेचे  सदस्‍य यावेळी उपस्थित होते.