नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्य सभेतले विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपाबाबत काढलेल्या उद्गारांवरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. राज्यसभेचे कामकाज सकाळी सुरु होताच खर्गे यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा सदस्यांनी घोषणाबाजी केली. राज्यसभेचे नेते पियुष गोयल यांनीही खर्गे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. आणि खर्गे यांनी भाजपा आणि देशाची माफी मागण्याची मागणी केली. खर्गे यांची भाषा, आचरण आणि वर्तन योग्य नसल्याचं गोयल यांनी नमूद केलं.

काँग्रेस पक्षामुळेच जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती बिघडली  तसंच चीन भारतीय भूमीत घुसखोरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आपण जे वक्तव्य केलं ते सदनाबाहेर केलं असून त्याचा सदनाच्या कामकाजावर परिणाम नको, अशी प्रतिक्रिया खर्गे यांनी दिली.  देशाच्या स्वातंत्र्य संग्रमात भाजपाची काहीही भूमिका नव्हती, असा आरोप खर्गे यांनी केला. काँग्रेसच्या २ प्रधान मंत्र्यांनी देशासाठी बलिदान दिलं, असं ते म्हणाले. लोकसभेत ही याच मुद्यावरून सदनाचं कामकाज साडे  ११ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं.