नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणुकांदरम्यानचा खोट्या बातम्यांचा प्रसार हा जगभरातल्या निवडणुकांमध्ये चिंतेचा विषय ठरल्याचं मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.
समाज विघातक घटक खोट्या बातम्या खऱ्या असल्याचं भासवून लोकांचा कल बदलण्याचा आणि त्यांना दिशाहीन करण्याचा प्रयत्न करतात असं ते यावेळी म्हणाले. ते आज नवी दिल्ली इथं, तंत्रज्ञानाचा उपयोग आणि निवडणुकांमधली निष्पक्षता या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना बोलत होते. निवडणूक व्यवस्थापन संस्थांसमोरच्या सध्याच्या आव्हानांचा उल्लेख करत, या संस्थांच्या कामात तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.