नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पीआयबी अर्थात पत्रसूचना कार्यालयाच्या वस्तुस्थिती तपास पथकानं आत्तापर्यंत अकराशेहून अधिक बनावट बातम्यांची प्रकरणं उघडकीला आणली आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
पीआयबीनं आत्तापर्यंत ३७ हजाराहून अधिक तक्रारी निकालात काढल्या आहेत. बनावट बातम्यांचा निपटारा करण्यासाठी सरकारकडे वैधानिक आणि संस्थात्मक यंत्रणा असल्याचं ते म्हणाले. नियमांचं उल्लंघन झालं तर सरकार आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया योग्य ती कारवाई करेल, असं ठाकूर यांनी सांगितलं.