नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं सीई २० क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. चांद्रयान ३ मोहिमेसाठी हे इंजिन एलव्हीएम ३ वाहकाला अधिक सक्षम करेल. तमिळनाडूतल्या महेंद्रगिरी इथल्या इस्रो संकुलात २४ फेब्रुवारीला ही चाचणी घेतल्याचं इस्रोनं आज सांगितलं.
नियोजित २५ सेकंद कालावधीत ही चाचणी केली गेली. सर्व परिमाणांवर ही चाचणी समाधानकारक असून अपेक्षेला उतरल्याचं इस्रोनं म्हटलं आहे. चांद्रयान मोहिमेची सुरूवात या वर्ष अखेरीला श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रातून होणार आहे.