नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकत्रित कृती करण्याचं आवाहन सर्व संबंधितांना केलं. नवी दिल्ली इथं आज राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रमांतर्गत, राष्ट्रीय सर्वोच्च समितीच्या बैठकीला संबोधित करताना यादव बोलत होते. त्यांनी या कार्यक्रमांतर्गत वर्ष २०२१-२२ मध्ये हवेची गुणवत्ता सुधारलेल्या ९५ शहरांच्या कामगिरीचं आणि २० शहरांच्या राष्ट्रीय वातावरणीय वायु गुणवत्ता मानकांचं कौतुक केलं.