नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त अरब अमिरातीहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांकडून महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच DRI च्या अधिकाऱ्यांनी विनापरवाना आणलेलं परकीय चलन, अतिरिक्त भारतीय चलन तसंच सोनं जप्त केलं. मिळालेल्या खबरीनुसार मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर संचालनालयाच्या चमूनं पाळत ठेवून १६ किलोहून जास्त सोनं आणणाऱ्या प्रवाशांना पकडलं. काही सोनं प्रवाशांच्या अंगावर पेस्ट स्वरुपात लपवलेलं होतं, तर काही सोन्याचे छोटे तुकडे किंवा दागिन्यांच्या रुपात सापडलं. याची एकूण किंमत अंदाजे १० कोटी रुपयांहून अधिक आहे, तपासणीनंतर अजून ८५ लाख किंमतीचं १ किलो ८५ ग्रॅम सोनं, विनापरवाना आणलेलं 88 लाखांचं भारतीय तसंच १६ लाखांचं परकीय चलन डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी हस्तगत केलं. या प्रकरणी १८ सुदानी महिला आणि त्यांचा भारतीय म्होरक्या यांना DRI च्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे.