पुणे : महसूल न्यायालयातील अर्धन्यायिक प्रकरणावर तडजोडीने निकाली काढण्याकरीता भोर उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे गुरुवार ११ मे रोजी सकाळी ११ वाजता विशेष लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.

उपविभागीय अधिकारी कार्यालय, भोर यांच्यासमोरील अर्धन्यायिक, अपील कामकाजामधील अर्धन्यायिक, अपील प्रकरणे विशेष लोकन्यायालयामध्ये घेण्यात येणार आहेत. या विशेष लोक न्यायालयामध्ये सुनावणीदरम्यान तडजोडनामा दाखल केल्यानंतर त्याच दिवशी अर्धन्यायिक, अपील प्रकरणामध्ये निर्णय पारित करण्यात येणार आहे.

या लोकन्यालयामध्ये तडजोडीसाठी ११ प्रकरणाची सद्यस्थितीत नोंदणी झाली आहे. विधीज्ञ, अशील, पक्षकारांनी विशेष लोक न्यायालयामध्ये सहभाग नोंदवून अधिकाधिक महसुली प्रकरणे निकाली काढण्यास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे.