नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी २० अंतर्गत भरलेल्या या परिषेदच्या उद्घाटनाला केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव दीपिका कच्छल उपस्थित होत्या. ई -श्रम पोर्टलच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील सुमारे २८ कोटी कामगारांची नोंदणी झाली. तसंच स्थलांतरित कामगारांनाही सामाजिक सुरक्षा मिळाण्यासाठी केंद्रीय श्रम मंत्रालय प्रयत्न करत असल्याचं कच्छल यांनी सांगितलं. परिषदेत आर्थिक सामाजिक सुरक्षा, अंतरराष्ट्रीय प्रवासी कामगार, असंघटीत क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा या विषयांवर गटचर्चा आणि सविस्तर चर्चासत्रे झाली.