नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं पूर्ण बहुमत प्राप्त केलं आहे. आतापर्यंत १८१ जागांचे निकाल जाहीर झाले असून त्यापैकी ११३ जागा काँग्रेस, ४७ भाजपा, १७ जनता दल धर्मनिरपेक्ष आणि ४ जागा अपक्षांना मिळालेल्या आहेत. एकूण २२४ जागांचा विचार करता आघाडी आणि विजय मिळवून काँग्रेस १३६, भाजपा ६५, जनता दल धर्मनिरपेक्ष १९ आणि अपक्ष ४ जागांवर आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासून काँग्रेसनं घेतलेली आघाडी कायम आहे.