नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्या देशात धर्मांची, जातींची वैविध्यता आहे, वेगवेगळ्या संस्कृती आहेत. कोणत्या देवाची उपासना करायची, याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण, राष्ट्रवादाला पर्याय नाही, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज नागपूर इथं भाजपानं आयोजित केलेल्या प्रबुद्ध नागरिक संमेलनात बोलत होते. प्रत्येकाच्या लेखी राष्ट्रहितालाच प्राधान्य असायला हवे, असंही गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी आणीबाणीच्या आठवणींना उजाळा दिला. आणीबाणीमध्ये लोकशाही वाचवण्यासाठी देशाने मोठा संघर्ष केला, अनेकांच्या बलिदानामुळे लोकशाहीची पुनर्स्थापना झाली, असं गडकरी यांनी सांगितलं.