नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि जपान यांच्यामध्ये आज पोलाद क्षेत्रातले सहकार्य आणि डीकार्बोनायझेशनच्या मुद्यांविषयी द्विपक्षीय बैठक झाली. दिल्लीत केंद्रीय पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि जपानचे अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योग मंत्री निशिमुरा यासुतोशी यांनी याविषयी बैठकीत चर्चा केली. दोन्ही देशांच्या पोलाद क्षेत्रात आर्थिक वाढ आणि कमी कार्बन संक्रमण या दोन्हींचा पाठपुरावा करण्याच्या प्रमुख मुद्द्यांसह देशाच्या व्यापाराची स्थिती लक्षात घेऊन धोरणात्मक दृष्टिकोन अवलंबण्याच्या महत्त्वावर त्यांनी या बैठकीत जोर दिला. भारत आणि जपान हे अनुक्रमे जगातले दुसरे आणि तिसरे सर्वात मोठे पोलाद उत्पादक असल्याचं मत दोन्ही नेत्यांनी व्यक्त केलं. स्टील डिकार्बोनायझेशनसाठी असमानता ओळखून शून्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी दोन्ही देशांनी सहकार्य करण्याला सहमती दर्शवली.