मुंबई (वृत्तसंस्था) : महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत सर्पदंश आणि ॲपेंडिक्स  या आजारांचा समावेश करण्यात येत असल्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे. याबाबतची लक्ष वेधी दीपक चव्हाण यांनी उपस्थित होती.

सध्या एकूण ९९६ आजारांचा समावेश यात आहे तो १३५६ केला जात आहे, याशिवाय एक विशेष समिती स्थापन करण्यात आली असून ती समिती कोणते आजार वगळायचे आणि किती आणखी घ्यायचे ते ठरवेल असं ही मंत्री म्हणाले.