नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारं संविधानातलं कलम ३७० रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधीशांचं घटनापीठ आजपासून दैनंदिन तत्वावर सुनावणी करत आहे. कलम ३७० आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा, २०१९ च्या तरतुदी रद्द करण्याला आव्हान देणार्‍या अनेक याचिका दाखल झाल्या होत्या, त्या घटनापीठाकडे पाठवण्यात आल्या होत्या. याचिकाकर्त्यांच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत.