नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनतेला अवयवदानाची सोप्या पद्धतीने माहिती मिळावी याकरता राज्यातील पहिलं ‘अवयवदान जनजागृती उद्यान’ ठाण्यात तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली. महापालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या या उद्यानात मूत्रपिंड, यकृत, हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड, या अवयवांच्या आणि पेशींच्या प्रतिकृती साकारण्यात येणार आहेत. तसंच यासंदर्भातील माहिती मोठ्या फलकावर लावण्यात येईल. याच उद्यानात अवयवदान करण्यासाठीचा प्रतिज्ञा अर्जही उपलब्ध करून दिला जाणार आहे.