नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोलकत्त्यातल्या विश्व बांग्ला पारंपरिक केंद्रात आजपासून सुरु होत असलेल्या ५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार आहेत.

यावेळी ते महोत्सवाला उपस्थित लोकांना संबोधितही करणार आहेत. नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा या हेतूनं या महोत्सवाचं आयोजन केलं जातं. या महोत्सवात गेल्या अनेक वर्षात भारतानं विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दिलेलं योगदान मांडलं जाणार आहे