नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोरोक्कोमध्ये गेल्या शुक्रवारी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २ हजार ८६२ वर पोहोचली आहे, तर अडीच हजारापेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली दबलेल्यांचा शोध घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे स्पेन, ब्रिटन आणि कतार या देशांची बचाव पथकं देखील मदत कार्यात सहभागी झाली आहेत.राजे मोहम्मद सहावा यांनी रविवारपासून तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखावटा जाहीर केल्यामुळे मोरोक्कोमध्ये ध्वज उतरवण्यात आले आहेत.