नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना कालपासून रद्द केला आहे. अपुरं भांडवल आणि उत्पन्नात वाढीची शक्यता नसल्याचं तसंच विविध तरतुदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी बँकेनं ही कारवाई केली. त्यानंतर सर्व व्यवहार थांबवण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं नगर अर्बन बँकेला काल दिले. सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधकांना या बँकेवर अवसायक नेमण्याची विनंती RBI नं केली आहे. बँकेच्या ९५ टक्क्यांहून अधिक खातेदारांना DICGC कडून सर्व ठेवी परत मिळतील.