नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातल्या अमेरिकन दूतावासानं ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान एक लाख चाळीस हजार विद्यार्थी व्हिसा जारी केले आहेत.तसंच या कालावधीत जागतिक स्तरावर अमेरिकेने एक कोटीहून अधिक बिगर स्थलांतरित व्हिसाही जारी केले आहेत. याव्यतिरिक्त,व्यवसाय आणि पर्यटनाच्या उद्देशाने जवळपास ८० लाख पर्यटक व्हिसा जारी केले आहेत,त्याच प्रमाणे वर्ष २०१७ पासून आतापर्यंत सुमारे सहा लाख विद्यार्थी व्हिसा अमेरिकन दूतावासाने जारी केले आहेत.या सगळ्या व्हिसांची संख्या वर्ष २०१५ नंतरची सर्वाधिक संख्या आहे.या वर्षी १० लाख नॉन इमिग्रंट व्हिसावर प्रक्रिया करण्याचं लक्ष्य असल्याचं अमेरिकन दूतावासानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.