नवी दिल्ली : देशभरात वेळेवर आणि उच्च दर्जाच्या आपत्कालीन आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गुंतवणूक वाढवण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. ते नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे दहाव्या आपत्कालीन वैद्यकीय आशियाई परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत होते.

आपत्कालीन स्थितीत नागरिकांना प्रथमोपचार संबंधी प्रशिक्षण देण्यासाठी आरोग्य क्षेत्रातल्या संबंधितांनी कार्यक्रम विकसित करावेत, जेणेकरून रुग्णांचे प्राण वाचवण्यात मदत होईल, असे ते म्हणाले. रस्ते अपघातात होणारे मृत्यू त्वरित प्रथमोपचार मिळाल्यास टाळता येऊ शकते, असे ते म्हणाले.

आपत्कालीन स्थितीत कोणतेही रुग्णालय उपचाराचा अधिकार नाकारू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.