नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचा उत्तराधिकारी निवडण्याचा मुद्दा संयुक्त राष्ट्राने उचलावा अशी इच्छा अमेरिकेचे राजदूत सॅम ब्राऊन बॅक यांनी व्यक्त केली आहे. लामा यांचा उत्तराधिकारी निवडण्याच्या चीनच्या प्रयत्नांना खीळ बसावी यासाठी आपली ही इच्छा असल्याचे ब्राऊन बॅक यांनी म्हटले आहे.
गेल्याच आठवड्यात ८४ वर्षीय दलाई लामा यांच्याशी भारतातील धरमशाला याठिकाणी त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याबाबत प्रदीर्घ चर्चा झाली. लामा यांचा उत्तराधिकारी चीनमधून नाहीतर बौध्द धर्माचे तिबेटियन अनुया यांच्यातून निवडावा या आपल्या मागणीसाठी जगभरातून पाठिंबा मिळवण्यासाठी कसून प्रयत्न करणार असल्याचे ब्राऊन बॅक यांनी लामा यांना सांगितले.