बारामती :  सर्व साधारण लोकशाही दिन मासिक बैठक तहसिलदार विजय पाटील यांचे अध्‍यक्षतेखाली तहसिल कार्यालय, प्रशासकीय भवन, बारामती येथे पार पडली.

या बैठकीस निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव, नगरपरिषदेच मुख्‍याधिकारी योगेश कडूसकर, उप अधिक्षक भूमी अभिलेख शिवप्रसाद गौरकर, तालुका कृषी अधिकारी दत्‍तात्रय पडवळ तसेच पोलीस व इतर शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी तहसिलदार पाटील यांनी उपस्थित कार्यालय प्रमुखांना लोकशाही दिनामध्‍ये येणाऱ्या तक्रारी बाबत तात्‍काळ कार्यवाही करण्‍याचे आदेश दिले. तसेच प्रत्‍येक विभागाच्‍या कामकाजा बाबतचा आढावा  घेतला .