नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इफ्फी या आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळा महोत्सवाच्या 50 व्या अंकाला आज गोव्यात पणजी इथं प्रारंभ झाला. या सुवर्णमहोत्सवी इफ्फीसाठी भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतल्या अनेक ताऱ्यांनी हजरी लावली.

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं की भारतीय संस्कृतीची ताकद भारतीय चित्रपटांनी जगभरात पोहोचवली आहे. चित्रपट उद्योगाच्या विविध गरजांसाठी सरकारनं एकखिडकी पद्धत सुरु केली आहे. दृष्टी दोष बाधितांसाठी अधिक चित्रपट काढावे असं आवाहन त्यांनी निर्मात्यांना केलं.

या झगमगत्या सोहळ्यात सुपरस्टार रजनीकांत यांना ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत सुवर्ण महोत्सव विशेष गौरव पुरस्कार जावडेकर यांनी प्रदान केलं.  केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांच्यासह अनेक मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते.